PawShadows
Complete online Certificate courses by Pawshadows –
1 Extensive Course in Telepathic communication with Animals and Nature, (all beings i.e. animals, birds, trees, lanscape etc.) that helps us to understand feelings, emotions, freewill including specific behavioural pattern, health issues, past life connections of our pets and even when they goes missing or they are passed away.
2 Extensive Tarot Card Reading Course – that helps us to seek guidance from the universe in various aspects of our material life.
पॉशॅडोजचे परिपूर्ण ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस –
1 प्राणी आणि निसर्गाशी (सर्व सजीव जसे प्राणी, पक्षी, झाडे, लँडस्केप इ.) टेलीपथिक कम्युनिकेशनचा व्यापक कोर्स. ज्याद्वारे आपल्याला पाळीव प्राणी तसेच अन्य सर्व जीवांच्या भावना, संवेदना, इच्छा स्वातंत्र्य, स्वभाव किंवा वर्तणुकीतील विशिष्ट बदल, आरोग्यविषयक बाबी, गतजन्माचे ऋणानुबंध इ. गोष्टी समजून घेण्यास, तसेच हरवलेल्या प्राण्यांशी, मृत्यू पावलेल्या प्राण्यांशी संवाद साधण्यासाठी मदत होते.
2 टॅरो कार्ड रिडींगचा व्यापक कोर्स – ज्या माध्यमातून आपल्याला भौतिक जीवनातील विविध विषयांसाठी वैश्विक ऊर्जेद्वारे मार्गदर्शन घेण्यास मदत होते.
Telepathic Animal & Nature Communication Course Contents
Tarot Card Reading Course Contents & FAQ
Energy follows intention and thoughts

Inner-Voice

Feeling

Sensation

Intuition

Energy

Intention

Amey Kulkarni
” Today’s session was very informative… Thank you Sharmila ma’am and Nupura for your genuine efforts… I truly appreciate your attitude of selflessness… Which teacher tells her students how to become their competitors!!? That too with so many small small things with proper handholding… Glad that I chose this course over the other ones… I remembered a saying – “People won’t remember you always for what you taught them, but they would remember you for the way you treated them”… And I must tell you that you won hearts today… Big thanks once again 🙏🙌🏻 #respect “

Shriniwas Mahabal
” हा विषय माझ्यासाठी खूपच नवीन होता. सुरुवातीला संमिश्र भावना मनामध्ये होती. उत्सुकता होती, तसेच हा विषय आपल्याला जमेल की नाही अशी शंका आणि काळजी मला होती. किंबहुना हा विषय पहिल्यांदाच ऐकल्यामुळे याअनुषंगाने भासणाऱ्या किंचित गुढतेच्या वलयाचा सामनाही माझे मन नेणिवेच्या पातळीवर करत होते. लोक आपल्याला हसतील की काय असेही वाटत असे. (हे आठवून आता कोर्स पूर्ण झाल्यानंतर हसू येते).
सांगण्या सारखे बरेच आहे, आणखी शिकण्यासारखे देखील खूप आहे. पण हे आवर्जून सांगावेसे वाटते कि या कोर्स मुळे मला प्रत्येक जीवामध्ये उपजत आणि अंगभूत असलेल्या या क्षमतेची ओळख झाली आणि त्याचा रोकडा अनुभव देखील आला. हे सर्व घडवून आणणाऱ्या, सतत आणि आस्थेने मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या गुरु शर्मिला मॅडम आणि नुपुरा मॅडम यांचे खूप खूप आभार. “

Mugdha Panvalkar
” मी हा कोर्स करणार म्हटल्यावर माझी लेक काही शांत बसेना. कारण आईची सर्व आवड तिच्यात उतरली आहे. तिलाही हा कोर्स करायचा होता. मग तिचीही सीट confirm केली. ह्या कोर्स द्वारे एखादे नवीन वेगळे ज्ञान आकलन करणे आणि ते आपल्या मेंदूत कायमचे साठवून ठेवणे हे एक आयुष्यात मिळवलेले कायमचे धन / पुंजी आहे.
शर्मिला आणि नुपूराची कोणताही त्रागा न करता शिकवण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. शिकवताना कायम हसरा , प्रसन्न चेहरा असतो. कधीही कोणावरही चिडत नाहीत. हे कौशल्य ज्याला जमेल त्याने नक्कीच उंच भरारी घेतली समजा.
शर्मिला आणि नुपूरा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि पुढे अशीच उत्तोरोत्तर प्रगती होवो. त्यासाठी शुभेच्छा “

Manisha Kulkarni
” Telepathic – Animal- communication was an incredible experience that opened my eyes to new experiences of connecting with my Mau, my cat. Sharmila Apte & Nupura Bhadkamkar, expertise and practical exercises helped me develop my telepathi communication skills. Highly recommended to anyone who loves animals and wants to communicate with them on a deeper level. “

Suvarna Tamboli
” शर्मिला आणि नुपूरा हा ७ आठवड्यांचा तुमच्या सोबतचा प्रवास कायमच लक्षात राहिल, जे मनात होते ते तुम्ही दोघींनी अतिशय डिव्होशन ने शिकवले, हे नविन क्षेत्र आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे, पॉझिटिव्हीटी वाढली, अॅनिमल कम्युनिकेटर म्हणून नक्की काम करणार, तेवढा कॉन्फिडन्स नक्कीच आलाय
तुमच्या दोघींचे मनापासून आभार❤❤ “

Dr Mukta Pathak Sharma
” मी खूप भाग्यवान आहे की मी एक पशुवैद्यक आहेच आणि त्याच बरोबर ॲनिमल कम्युनिकेटरही बनले आहे. धन्यवाद Pawshadows, Sharmila Apte,
Nupura Bhadkamkar
I always feel proud for being a veterinarian and I am perusing animal communication as well . Thank you @Pawshadows “

Vrinda Panchawagh
” फेसबुक वर pawshadows यांची animal communication ची पोस्ट पहिली.. त्याबद्दल अजून माहिती शोधल्यावर मी त्यांच्या २ गोष्टींनी भारावून गेले.. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हा कोर्स नुपुरा आणि शर्मिला मॅडम मराठीमध्ये घेतात.. आणि त्यांच्या कोर्सचे रिव्हिव्ह /फीडबॅक भारी होते.. या कोर्सची मांडणी खूप व्यवस्थितपणे आखली आहे.. आधी अगदी मूळ छोट्या छोट्या गोष्टींपासून पुढे हा विषय खोल खोल उलगडत जातो.. आणि हे कॉम्युनिकेशन फक्त पाळीव प्राण्यांशी मर्यदित नसून जंगली प्राणी, झाडे, पक्षी इत्यादी कोणासोबतही साधता येते.. मला पहिल्यापासूनच निसर्गाची ओढ.. त्यामुळे निसर्गाच्या अजून जवळ जाण्याचे हे माध्यम अजूनच आकर्षक वाटले.. 😊 “

Sangeeta Shembekar
” नमस्ते शर्मिला व नुपुरा.. कोर्सचे सात आठवडे मंत्रावल्यागत गेले.. टेलीपॅथीक अॅनिमल कम्युनीकेशन हा विषय आखीवरेखीव व पद्धतशीर उकल करत शिकवलात…सात वार सात नवे आयाम दाखवलेत..शिकणार्यांनाही चांगले प्रोत्साहन दिलेत..स्वतःचे ऊदाहरण देउन मैत्रिपुर्ण वातावरणात सारे घडले आॅनलाईन असुनही याचा आनंद व्यक्त करते…सर्व सहअध्यायिंच्या वतीनेही पुढील वाटचालीला मंगल शुभेच्छा देते व स्नेह निरंतर ठेवत पुर्णविराम देते..!!खुप यश व संवादगुण वाढो ही उर्जेचरणी प्रार्थना..!!शुभम् भवतु “

Swati Koushik
” The above course designed & conducted by PawShadows is truly an extensive & amazing course. The course content is in depth & beautifully designed. The study material provided is very elaborate, self explanatory & available in English as well as Marathi. The videos & online sessions conducted by by trainers Sharmila Apte & Nupura Bhadkamkar are extremely systematic, precise as well as detailed. The supporting videos shared are also very helpful. Painstaking attention to minute details has been given. The website is very intricately designed & flawless. As teachers Sharmila & Nupura are wonderful & par excellence. “

Ashok Joshi
” Dear Nupura & Sharmila,
These were the great sessions. It was beyond my imagination that a human can communicate with the animals and landscapes. But wow…you showed us through this journey of multiple sessions that how its possible. It was beautifully communicated how the clarity, sincerity , thoughts, intensions, feelings makes it possible. The importance of grounding, taking the help of universe was just outstanding. “

Pranav Kulkarni
” Since, I have gone through the Course organised by some other foundation. आणि कशाप्रकारे त्यांनी पहिल्याच दिवशी actual telepathy communication सुरू केले होते. यावरून मला असे वाटते की हे सेशन्स सुरू करण्यापूर्वी तुम्ही दोघांनीही अतिशय परफेक्ट Need analysis केलेला आहे. आपल्या सेशन मधील participants अतिशय लकी आहेत.. “

Yogini Karve
” शर्मिला आणि नुपुरा तुम्हा दोघीं मुळे मातीशी पुन्हा एकदा जोडले गेले. त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे . खूप छान प्रवास होता तुमच्या बरोबरचा खूप खूप धन्यवाद 🙏🌹🌹🍫🍫 “

Kalika Gokhale
” खरोखरच शर्मिला आणि नुपुराला शतश: धन्यवाद, तुमच्या मुळे एक नविन अद्भुत ज्ञानाच दालन आमच्या साठी खुलं झालं, आणि जितकं आत जाऊ तितकी अद्भुत रत्नं सापडताहेत..
🙏🙏🙏 “

Meenal Daftardar
” शर्मिला आणि नुपुरा यांनी खूप बारीकसारीक विचार करुन ठरवलेला अभ्यासक्रम, त्यांचं अतिशय एनकरेजिंग आणि मृदू बोलणं. कोणत्याही शंकेचं निरसन होईपर्यंत पुढे न जाणं. मजा आली हे सगळं शिकताना. अजून खूप सराव गरजेचा आहे. पण या दोघी कधीही काहीही अडचण आली तर तत्पर आहेतच मदतीला ही खात्रीही आहे.
मनापासून आभार शर्मिला आणि नुपुरा 🙏❤️ “

Chaitrali Vishal Dahiwal
“निसर्गाची, पशू पक्ष्यांची आवड आहे, या घटकांसाठी काहीतरी करायची आवड आहे, आयुष्यात काहीतरी वेगळं करायचंय तर मग हा कोर्स केलाच पाहिजे. याचा सोपा आणि उत्तम अभ्यासक्रम नुपूरा आणि शर्मिला ताईने उपलब्ध करून दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.. उत्तम कंटेंट, step by step learning modules मुळे समजायला आणि प्रॅक्टिस करायला सोप होत, कोर्स ची बांधणी मुद्देसूद आहे आणि शंका निरसन करणारे videos तसेच online ऑफलाईन मार्गदर्शन मिळाल्यामुळे हा कोर्स इतर कोर्सेसपेक्षा वेगळा ठरतो, जरूर प्रत्येकाने करा आणि हे ज्ञानाचे नवे दालन स्वतःसाठी उघडा”

Priyanka Karle, Kalyan
“ नुपुरा व शर्मिलाने अत्यंत अचूक व सुंदर पद्धतीने हा कोर्स डिझाईन केला आहे. वेबसाईट तर अफलातून बनवली आहे. अभ्यासक्रमातील लेख व व्हिडियो पाहूनच कोणालाही हा कोर्स शिकता येईल इतकं सोपं करुन दिलंय. क्लासमधे दोघींचे टायमिंग व प्रत्येक स्टुडंटच्या पातळीवर जाऊन शिकवण्याची पद्धत कमालीची आहे. ह्या विषयात ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी नक्कीच शर्मिला व नुपुर कडून नक्कीच हा कोर्स करा. ”
