कावळ्याबरोबरचा मुक्तसंवाद
- Posted by Pawmitra and Ocean Shadows
- Categories Blog
- Date April 13, 2022
परिस्थिती स्वीकारणं, परिस्थितीशी जुळवून घेत पुढे जाणं माणसांना अवघड जातं, पण निसर्ग, प्राणी पक्षी हे खूप सहजतेने करतात…
सहा सात वर्षांपूर्वी स्वैपाकघराच्या खिडकीत एक कावळा यायचा. काही स्वैपाक सुरू असतानाच यायचा बरोबर. आणि त्यावेळी जे काही शिजत असेल/ तयार असेल ते देईपर्यंत काव काव करून भंडावून सोडायचा. पोळी, भाकरी, धिरडी, थालीपीठ, डोसा, भात, भजी किंवा अक्षरशः काहीही! तसे वेगवेगळे कावळे खाऊ घ्यायला यायचेच, पण हा जरा वेगळा होता. याला एकच पाय होता, बहुदा जन्मतःच! दुसरा पाय होता पण शॉर्ट होता आणि त्याला बोटं/नख्या नव्हत्या. आम्ही त्याला पहिल्यांदा बघितलं तेव्हा आश्चर्य आणि वाईट वाटलं होतं. समोरच्या कडुलिंबाच्या फांदीवर तो बसायचा. सतत एकाच पायावर बॅलन्स करत त्याला बसावं लागायचं. कधी बॅलन्स साधायला थोडे पंख हलवायचा. कसा सर्वाईव्ह करेल हा? असा प्रश्न आम्हाला पडायचा. पण त्याच्यात असलेली उणीव त्याने व्यवस्थित स्वीकारली आणि त्यावर मात करत तो छान जगत होता. काही काळ असा होता की तो अक्षरशः रोज यायचा नियमाने. आम्हालाच त्याची बसण्याची, उभं राहण्याची धडपड बघून वाईट वाटत राहायचं. खरा प्रश्न यायचा तो खाताना… जनरली कावळे एका पायात खाद्य पकडून चोचीने तुकडे तोडून खातात, पण याला मुळातच एक पाय! तो झाडावर अशा जागी बसायचा जिथे फांदीच्या बेचक्यात खाऊ दाबून चोचीने तोडून खाता येईल… जो एकच पाय होता त्याने फांदीवर पकड असायची, कधीकधी त्यातच खाद्य पण पकडायचा… म्हणजे आपल्या कमतरतेवर त्याचा त्यानेच मार्ग शोधला होता. बऱ्याचदा खाणं सांडून पण जायचं थोडं फार, पण पुष्कळ जमवून घेतलं होतं त्याने. आम्ही आधी त्याला त्रास नको म्हणून छोटे छोटे तुकडे खिडकीत ठेवायचो, पण त्याला पुन्हा पुन्हा येणं आवडत नसल्याचं लक्षात यायला लागलं, मग जेवढं द्यायचं ते एकदमच द्यायला लागलो…
हळूहळू आपसूकच त्याचं येणं कमी झालं. पण थोड्या थोड्या दिवसांनी दिसत राहायचा. मधे मात्र बराच काळ दिसेनासा झाला… काय झालं असावं? कावळ्यांचा life span किती असतो याचा विचार करत होते… लॉकडाऊन मधे जेव्हा टेरेस वर चालायला जायचे, तेव्हा एक दिवस अचानकच समोर येऊन कठड्यावर बसला. खूप बरं वाटलं त्याला बघून. मग परत गायब… आत्ता काही दिवसांपूर्वी काहीतरी निमित्त झालं आणि पुन्हा त्याची आठवण आली.. जिवंत असशील तर एकदा तरी दिस रे मला असं त्याला विनवत होते मी… आणि त्यानंतर एक दोन दिवसांनी घरापाशी पोहे इडली वगैरे नाश्त्याच्या स्टॉल जवळ हा रस्त्यावर काहीतरी टिपताना दिसला!! पुन्हा बरं वाटलं त्याला बघून… अचानक आलेली आठवण, टेलिपथिक कम्युनिकेशनद्वारे त्याला दिलेली साद, आणि त्याला प्रतिसाद देऊन त्याचं असं समोर येणं… हे सगळं खूप समाधानकारक होतं😊
एका पायाने अधू असूनसुद्धा इतकी वर्षे तो जगला, आणि छान जगला. कारण त्याने परिस्थिती स्वीकारली आणि त्या परिस्थितीशी जुळवून कसं जगायचं हेही शिकून घेतलं!😊
टेलिपथिक कम्युनिकेशन आपल्या पाळीव प्राण्यांशी बोलण्यासाठी खूप उपयुक्त ठरतंच, त्याबरोबरच आपल्या आजूबाजूला निसर्गात मुक्त जीवन जगणारे प्राणी पक्षी आणि इतर जीवांशी सुद्धा आपण कनेक्ट होऊ शकतो, बोलू शकतो हे फिलिंग अनुभवणं किती छान आहे!
– नुपुरा
You may also like
बेपत्ता मॉलीशी संवाद , काळजी आणि पुनर्भेट!
पाळीव प्राणी जेव्हा हरवतात, तेव्हा त्यांचे पालक खूप जास्त चिंता करू लागतात… कम्युनिकेटरकडे येणाऱ्या जवळपास प्रत्येक केस मधे याचा अनुभव येतोच. कम्युनिकेशन मधे प्राण्यांनी आपण सेफ असल्याचं उत्तर दिलं तरीही आपलं बाळ नजरेला पडेपर्यंत जीवात जीव नसतोच. पण जेव्हा प्राण्यांनी दिलेल्या उत्तरांची प्रचिती येऊ लागते तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडतो… मॉली माऊ दोन दिवस घरी न आल्यामुळे काळजीत असणाऱ्या भार्गवीला मॉली बरोबर झालेलं पहिलं कम्युनिकेशन मी पाठवलं. त्यामधे मॉलीने ती सेफ आहे, घराच्या जवळच आहे आणि लवकरच स्वतःहून परत येईल असं सांगितलं होतं. तिने ती जिथे आहे असं सांगितलं, तिथल्या खाणाखुणा मॅच होत होत्या. पण ती सापडली नाही. तू काही …
गप्पागोष्टी चेरीच्या
communication म्हणजे काय…आपण एकमेकांशी गप्पा मारतो त्यावेळी प्रश्नाला मोजून मापून ठराविकच शब्दांत उत्तर देत नसतो.. मूळ विषयाला धरून त्या अनुषंगाने नवीन माहिती, आणखी एखाद प्रसंग गोष्ट सहज बोलला जातो…मग animal communication ही तसेच साधारण असते का?… पूर्वीचा माझा अनुभव प्रश्नाला उत्तर असा होता. पण नूपुरा चेरी मध्ये चक्क गप्पा झाल्या असाव्यात! आमच्या समजूतदार शहाण्या चेरीला(pet cat) घेऊन सव्वा वर्षानंतर प्रथमच प्रवास करणार होतो..प्रवास, लग्न घर, पाहुणे, तिथे आणखी एक माऊ असे आणखीही बरेच issues थोडे काळजी वाढवत होते म्हणून नुपूराला तिच्याशी बोलायला सांगितलं. नूपुराने तिच्याशी गप्पा मारत आम्ही सांगितलेली माहिती दिली व काही चेरीकडून घेतलीही!..त्यात चेरीने चक्क आमचे पुण्याचे घर …
भटकूचे भावबंध
भटकू, माझी स्ट्रे मांजर मध्यंतरी बरेच दिवस गायब झाली. तिच्यासाठी रोज दिवसातून तीनदा मी सगळा जावळपासचा भाग पिंजून काढत असे, खूप शोधून, खाऊचा डबा वाजवून सुद्धा काहीच अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. दिवसागणिक आशा कमी कमी होऊ लागली होती. कोणाला क्लीअर सिग्नल्स मिळत नव्हते, फार वाईट वाटू लागले होते. तरीही, शेवटची संधी घ्यावी म्हणून नुपुराला मी तिच्याशी संवाद साधण्याची विनंती केली. मला धीर देत नुपुराने तिच्याशी संवाद साधून साधारण ती कुठे आहे, आजूबाजूचा एरिया इत्यादीचे सिग्नल्स दिले, भटकू ठीक आहे हा विश्वास दिला. पुढे चार दिवसांत भटकू परतली. ती जिथे, ज्या इमारतीत सुरक्षिततेसाठी बसली होती, ते ठिकाण माझ्या घरापासून अगदीच जवळ …