गप्पागोष्टी चेरीच्या
communication म्हणजे काय…आपण एकमेकांशी गप्पा मारतो त्यावेळी प्रश्नाला मोजून मापून ठराविकच शब्दांत उत्तर देत नसतो.. मूळ विषयाला धरून त्या अनुषंगाने नवीन माहिती, आणखी एखाद प्रसंग गोष्ट सहज बोलला जातो…मग animal communication ही तसेच साधारण असते का?…
पूर्वीचा माझा अनुभव प्रश्नाला उत्तर असा होता.
पण नूपुरा चेरी मध्ये चक्क गप्पा झाल्या असाव्यात!
आमच्या समजूतदार शहाण्या चेरीला(pet cat) घेऊन सव्वा वर्षानंतर प्रथमच प्रवास करणार होतो..प्रवास, लग्न घर, पाहुणे, तिथे आणखी एक माऊ असे आणखीही बरेच issues थोडे काळजी वाढवत होते म्हणून नुपूराला तिच्याशी बोलायला सांगितलं.
नूपुराने तिच्याशी गप्पा मारत आम्ही सांगितलेली माहिती दिली व काही चेरीकडून घेतलीही!..त्यात चेरीने चक्क आमचे पुण्याचे घर तिला दाखवलं…आणखी एक प्रश्न चेरीने नूपुराला स्वतःहुन विचारला तो म्हणजे नवीन ठिकाणी गवत मिळेल का?… चेरीला गवत प्रिय आहे हे माझ्या आणि नुपुराच्या संवादात कधीच आलं नव्हतं..त्यामुळे चेरी ची खास रिक्वेस्ट नुपुराने आमच्यापर्यंत पोचवल्यावर फार कौतुक आणि आश्चर्य वाटलं.
प्राण्यांनाही आपली आवड निवड असते आणि ते ती ठामपणे सांगू शकतात हे ही या संवादातून अधोरेखित झालं.. गप्पांमध्ये चेरीने संगीत आवडत असल्याचे सांगितलं..किती गम्मत ना?..आणि हा धागा पकडत लगेच कुशल संवादक नुपुराने तिला cat calming music लावुया का विचारलं..तिला त्या music ची झलकही दाखवली!! चेरीने आवडेल की म्हंटल्यावर नुपूराने प्रवासादरम्यान संगीत ऐकत झोपून जा असा सल्ला दिला त्यावर मात्र ठामपणे..मी झोपणार नाही..मला प्रवास आवडतो ना..मी एन्जॉय करते म्हंटले!..अशा मस्त शिळोप्याच्या गप्पा झाल्या दोघींत!!
एकूण आमचे नुपुरच्या चेरिशी संवादातून खूप समाधान झालं…पुढे कधीही कोणालाही गरज भासल्यास नुपूराचे नाव नक्कीच सुचवेन