बेपत्ता मॉलीशी संवाद , काळजी आणि पुनर्भेट!
पाळीव प्राणी जेव्हा हरवतात, तेव्हा त्यांचे पालक खूप जास्त चिंता करू लागतात… कम्युनिकेटरकडे येणाऱ्या जवळपास प्रत्येक केस मधे याचा अनुभव येतोच. कम्युनिकेशन मधे प्राण्यांनी आपण सेफ असल्याचं उत्तर दिलं तरीही आपलं बाळ नजरेला पडेपर्यंत जीवात जीव नसतोच. पण जेव्हा प्राण्यांनी दिलेल्या उत्तरांची प्रचिती येऊ लागते तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडतो…
मॉली माऊ दोन दिवस घरी न आल्यामुळे काळजीत असणाऱ्या भार्गवीला मॉली बरोबर झालेलं पहिलं कम्युनिकेशन मी पाठवलं. त्यामधे मॉलीने ती सेफ आहे, घराच्या जवळच आहे आणि लवकरच स्वतःहून परत येईल असं सांगितलं होतं. तिने ती जिथे आहे असं सांगितलं, तिथल्या खाणाखुणा मॅच होत होत्या. पण ती सापडली नाही. तू काही खाल्लं आहेस का? या प्रश्नाला “नाही, मी घरी गेल्यावर खाईन” असं उत्तर मॉलीने दिलं. यानंतर दुसऱ्या दिवशी भार्गवीचा पुन्हा msg आला, “इथे मांजरांच्या भांडणाचे आवाज येतायत आणि मला असं स्ट्रॉंग फिलिंग येतंय की त्यात मॉली असावी. प्लिज एकदा परत बोलून पहा.” माऊ परत आली नाहीये आणि मांजरांच्या भांडणाचे आवाज येणं हे अर्थातच काळजी वाढवणारं होतं! पण मॉलीशी जेव्हा संवाद साधला तेव्हा तिच्याकडून हे स्पष्ट उत्तर मिळालं की भांडणाऱ्या माऊ वेगळ्या आहेत, मी त्यात पडत नाही आणि मी लवकरच(पहाटेपर्यंत) परत घरी जाईन. या संवादानंतरच्या पहाटे मॉली सुखरूप घरी आली, अंगावर कोणतीही जखम नाही, भांडण केल्याची कोणतीही खूण नाही आणि तिने सांगितलं त्याप्रमाणे चार दिवस काहीही न खाल्ल्याने थोडी बारीक मात्र झाली होती!
निसर्ग, पंचमहाभूतं पदोपदी आपल्याला सहकार्य, मार्गदर्शन करत असतातच… त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच!❤️🙏🏻
#animalcommunication
– नुपुरा