भटकूचे भावबंध
भटकू, माझी स्ट्रे मांजर मध्यंतरी बरेच दिवस गायब झाली. तिच्यासाठी रोज दिवसातून तीनदा मी सगळा जावळपासचा भाग पिंजून काढत असे, खूप शोधून, खाऊचा डबा वाजवून सुद्धा काहीच अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. दिवसागणिक आशा कमी कमी होऊ लागली होती. कोणाला क्लीअर सिग्नल्स मिळत नव्हते, फार वाईट वाटू लागले होते. तरीही, शेवटची संधी घ्यावी म्हणून नुपुराला मी तिच्याशी संवाद साधण्याची विनंती केली.
मला धीर देत नुपुराने तिच्याशी संवाद साधून साधारण ती कुठे आहे, आजूबाजूचा एरिया इत्यादीचे सिग्नल्स दिले, भटकू ठीक आहे हा विश्वास दिला. पुढे चार दिवसांत भटकू परतली. ती जिथे, ज्या इमारतीत सुरक्षिततेसाठी बसली होती, ते ठिकाण माझ्या घरापासून अगदीच जवळ होते, आणि ह्याच जागेचे सिग्नल्स नुपुराने दिले होते. तिथे फक्त कोणाला जायची परवानगी नसल्याने तेव्हा आतून बघू शकले नाही. भटकू आली तेव्हा लंगडत होती, आल्यावर त्याच दिवशी तिला दवाखान्यात हलवले.
एक पिवळ्या रंगाचा कुत्रा भटकूचे रक्षण करत आहे असे रिडींगवेळी नुपुराने मला सांगितले होते. विलक्षण म्हणजे भटकू परतून आल्यावर, दोनच दिवसांनी एक पिवळ्या रंगाचा कुत्रा आवारात येऊन – जो ह्या आधी कधीच आलेला नाही – काही शोधत राहिला, त्याच्यापुढे जाऊन भटकू ठीक आहे व दवाखान्यात आहे म्हटल्यावर शांतपणे निघून गेला. हे अवाक व्हायच्या पलीकडले होते!
माझी मानसिक स्थिती ओळखून अतिशय संवेदनशीलपणे आमचा संवाद घडवून दिल्याबद्दल आणि माझ्या भटकू येण्याबद्दलच्या आशा पल्लवित ठेवल्याबद्दल नुपुराचे आभार मानावेत तितके कमी आहेत!
तसेच भटकू हॉस्पिटल/ फॉस्टरमध्ये राहत असताना नुपुराने मला तिला धीर द्यायला आणि तुला पुन्हा घरी घेऊन जाणार आहे, हे आश्वस्त करण्याकरता खूप मदत केली.
संवेदनशील आणि प्राणीप्रेमी कम्युनिकेटर भेटणे हे फार गरजेचे आहे. नुपुरा, तू नक्कीच त्यात मोडतेस.
तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!