माँटीची विलक्षण शोधकथा
◦#telepathiccommunication
#animalcommunicator#animalcommunication
🙏🏻 जेथे दिव्यत्वाची प्रचिती ,तेथे कर माझे जुळती🙏🏻
◦ नमस्कार वाचक मित्रहो! खरंतर खूप दिवसांनी आज लिहायला घेतल 📝आहे. कारण खूप दिवस झाले लिहायला घ्यायचं पण मन लागत😔 नव्हतं. आज मी जे लिहिणार आहे.त्या गोष्टीशी कदाचित बरेच लोक अनभिज्ञ आहेत.या जगात देवाने जशी मानव जात निर्माण केली.तशीच सजीव प्राणी,पक्षी,किडा-मुंगी पण 🐱🐶🐥🪰🦚केलेत.माणसाला बोलायला येत. Communicate करता येतं.म्हणून तो सृष्टीतला सगळ्यात बलवान किंवा बुद्धिमान आहे. तर आता गैरसमजातून बाहेर येण्याची वेळ आली आहे.सृष्टीला माणूस,झाड,प्राणी,पक्षी या सगळ्यांची सारखीच गरज आहे.त्याशिवाय निसर्गचक्र अधुरे आहे.
◦ दिनांक २७.०८.२०२१ वार शुक्रवार माझ्या घरी श्री.सत्यनारायणाची पूजा होती🙏🏻.श्रावण महिन्यातला सत्यनारायण मी व ओंकार पूजेला बसलो होतो.सोबत आमच्या बरोबर आमचा १ वर्षाचा बोका Monty होता.सगळं आटोपल आणि रात्री ८.०० वा. Monty घरातून बाहेर पडला.खूप आवाज दिले.पण तो कुठे दिसलाच नाही.एरवी तो सगळीकडे फिरून परत घरी येत असे.पण त्या रात्री मात्र तो घराकडे फिरकला नाही.पूर्ण रात्र मला व ओंकारला नीट झोप नाही.मग सकाळी मी व ओंकार मागे गल्ल्यांमध्य्े त्याला शोधायला निघालो.मागच्या गल्लीत तो एका गाडीखाली रात्रभर बसून होता आणि सकाळी आम्ही पोचायच्या आधी तो त्या ठिकाणाहून गायब झाला होता.खूप शोधले पण पत्ता नाही.Monty पर्शियन जातीचा असल्याने अतिशय देखणा ,गुबगुबीत ,पांढरा स्वच्छ होता.❤️🥰
◦ सगळे म्हणाले ‘मांजर आहे, घराची वाट चुकणार नाही येईन परत….” खूप वाट पाहिली, मग व्हाट्सअप वर फेसबुक वर मेसेज Viral केला की हरवला आहे. माझ्या एका मैत्रिणीने, शर्वरी वाकचौरे हिने मला एक फेसबुक पोस्ट पाठवली. त्यात हरवलेले प्राणी-पक्षी शोधून देणाऱ्या चिरंजीव .ओजस आर्वीकर चे नाव होते. ओंकारने ओजस ला फोन केला. डिटेल्स दिले. ओजस ने Monty सोबत कनेक्ट होऊन पहिला सिग्नल दिला की तो जिवंत आहे. थोडी मनाला शांती मिळाली. 🤗मी व ओंकार हे पहिल्यांदाच अनुभवत होतो. पुढील सिग्नल ओजस कडून आले कि Monty ला पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलय, भिंतींना निळा ( स्काय ब्लू )रंग आहे आणि त्याला घरी यायचं आहे. 😢🥺पूर्ण संगमनेर मध्ये पत्र्याची शेड असणारी घरं खूप आहेत. बस्स निदान इतकी खात्री पटली कि Monty Safe आहे. बाहेर भरकटला असता तर कुत्रे मांजरांनी जखमी केले असते.
◦ माझी नणंद अमृता, हिला मी याबद्दल सांगितले. तर तिने मला सौ. प्रियंका कार्ले यांनी लिहिलेल्या #telepathicanimalcommunication बद्दल पोस्ट पाठवली. त्यात दोन जणींचे उल्लेख होते. सौ.शर्मिला आपटे यांना मी व्हाट्सअप वर मेसेज केला. त्यांना फोन वर डिटेल्स दिले. शर्मिलाताईं ने मला माझ्या घरच्याखिडक्यांमधून वेगवेगळ्या डायरेक्शन चे फोटो मागितले. बरोबर एक तासाने Monty सोबत कनेक्ट होऊन त्यांनी पुढील सिग्नल दिले.
◦ १) तुमच्या घराच्या गल्लीपासून तिसर्या गल्लीत तो आहे.
◦ २) तिथे दर्गा आहे.
◦ ३) हलाल /चिकन शॉप आहे.
◦ ४) भांड्याची दुकाने आहेत.
◦ ५) गजबजलेला भाग आहे.
◦ ६) नळाचे कोंडाळे आहे.
◦ ७) Monti दुमजली बसक्या घरात आहे. वरच्या बाजूला पत्राआहे. घराला वरती लोखंडी कठडा आहे.
◦ ८) घरात एक म्हातारे आजोबा त्यांची बायको,मुलगा,सून आहे.
◦ ९) घरातली माणसं चांगली आहेत खायला-प्यायला देतात.तो breeder कडे असू शकतो.
◦ १०) बाहेर सोडत नाहीत , Monti ला घरी यायचं आहे.
◦ कधीकधी प्राणी स्वतःच्या मर्जीने घर सोडून निघून जातात. पण AnimalCommunicator त्यांच्यासोबत कनेक्ट होऊन त्यांच्या भावभावना समजून घेतात आणि AnimalCommunicator चे काम फक्त प्राण्यांशी कनेक्ट होणं ,आपले मेसेज त्यांच्यापर्यंत पोहचवण इतकंच आहे. ते तुम्हाला GPS Trackar सारखं लोकेशन सांगत नाहीत. मी व ओंकार शर्मिला ताई यांनी दिलेल्या माहिती वरून अक्षरश: स्तब्ध झालो. 😱🤭🙏🏻ही एक दिव्यत्वाची प्रचिती होती. दुसऱ्या दिवशी ओंकार तिथे जाऊन आला. वाटेत दुमजली घर, चिकन शॉप, सगळं लागलं. पण Monty दिसला नाही. ओंकार चे मित्र मुजीब भाई, मुक्तार भाई’ जावेद ,जुनेद यांनी सर्व व्हाट्सअप ग्रुप वर त्याचा फोटो व माहिती वायरल केली. पण तो घरात असल्याने त्याला त्या भागात कोणीच पाहिले नाही. जवळपास पंधरा दिवस त्या भागातून Montyचा शोध सुरू होता. पण तो कोणाला दिसला नाही. आम्ही हिम्मत हरणार नव्हतो. दिनांक १३.०९.२०२१ रोजी मला महालक्ष्मीच्या प्रसादासाठी सवाष्ण म्हणून आमंत्रण होतं. मी आकाश सोबत रिक्षाने जाऊन आले. त्याला सर्व हकीकत सांगितली. संध्याकाळी महालक्ष्मीचे हळदीकुंकू होते. आकाशने त्याच्या मित्राला सांगितले , जो त्याच भागात राहत होता. त्याच्या मित्राने पण खूप मदत केली. १५.०९.२०२१ सकाळी १० वाजता ओंकार चा मित्र तौसीबने एका बोक्याचा फोटो पाठवला. त्याच एरियामध्ये Spot झाला होता. मी सौ.साधनाताई परांजपे व शर्मिलाताई यांना तो फोटो पाठवला. तो Monty च आहे हे त्या दोघींनी सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावर हरवल्यासारखे भाव होते. त्या दोघी सुद्धा Monty सोबत कनेक्ट झाल्या. त्याला आता मोकळे सोडले होते. ओंकार लगेच परत त्या एरिया मध्ये गेला. खूप शोधले पण Monty तिथून गायब झाला होता. ओंकारने गणेश,प्रणव सोबत जाऊन अक्षरशा वीस पंचवीस वेळा ती जागा पिंजून काढली. पण काही तो दिसेना.
◦ Golden Chord Communication बद्दल मला या तीनही Communicator ने सांगितले होते. मी रोज रात्री गुरुदेव दत्त, श्री.स्वामी समर्थ यांचे ध्यान करून Montyला मानसिक पाठबळ देत होते. Golden Chord बरेच प्रकार आहेत ..साधनाताईंनी मला सांगितले की मॉन्टी त्याच एरिया मध्ये फिरतोय. तो खूप Traumatic Condition मध्ये आहे. त्याच्यात एनर्जी पण नाहीये आता. लवकर पावले उचलायला हवीत. साधनाताईंनी मला Golden Chord व अजून काही बरेच तोडगे सांगितले. मी हर एक प्रयत्न केला. साधनाताईंनी Montyला त्याच्या पद्धतीने एनर्जी ट्रान्समिशन करून त्याची ऊर्जा वाढवण्याचे प्रयत्न चालू ठेवले. शर्मिला ताईंनी सुद्धा तिथल्या लॅण्डस्केप शी कनेक्ट होऊन Montyला घराकडे वळवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. जेव्हा माणूस संकटाच्या कचाट्यात सापडतो. तेव्हा त्याला जात किंवा धर्म नसतो. मी व ओंकार जेव्हा केव्हा दर्गा पासून जात होतो. आता चातक पक्षासारखी आम्ही Montyची वाट पाहत होतो. मी अल्लाला म्हटले,’माझं बाळ तुझ्या दारात आहे. 🕋🤲🏻🤲🏻सहीसलामत त्याला घरी येऊ दे. मॉन्टी समोर मला काहीच दिसत नव्हते. फक्त आणि फक्त वाट बघणे. एक रात्र अशी गेली नाही कि आम्हाला त्याची आठवण आली नाही.🥺😢
◦ शनिवार दिनांक १८.०९.२०२१ ११वा. साधनाताई परत Monty बरोबर कनेक्ट झाल्या.Monty दर्ग्याजवळ होता त्यांनी पुढील सिग्नल दिला.
◦ १) Monty ला मोकळे सोडले आहे
◦ २) तू जिथे आहे. तिथे मेडिकल, चिकनची दुकान व दुमजली इमारत आहे.
◦ ३) भिंतींना बाहेरून निळा रंग आहे.
◦ साधनाताईंनी सांगितले की मी Montyला एनर्जी ट्रान्समिशन करत आहे. सोबत जाताना त्याचा खाऊ पेडिग्री न्या त्याचा डबा न्या ..Monty अत्यंत वेदनेतून जात होता. तो कावरा बावरा झाला होता. ओंकार व प्रणव परत तिथे गेले. डबा वाजवला त्या एरियातून सगळी मेडिकल पालथे घातले. पण तो कुठे दिसला नाही. तो तिथेच भरकटत मोकाट फिरत होता. पण आम्हाला दिसत नव्हता. ओंकार म्हणाला,”रेणू आता बस ………मी Hopes सोडल्या आहेत. आपण आता खूप प्रयत्न केले. त्या एरिया मध्ये प्रत्येक माणूस Montyच्या नावाने आम्हाला ओळखत होता. आमचा बोका २७.०८.२०२१ पासून TalkOf TheTown झाला होता. 😂सगळे प्रयत्न झाले पण वाट काही सापडेना. माझं मन मात्र हार मानायला तयार नव्हत✌️.
◦ साधनाताईंनी मला त्यांच्या काही पद्धतींनी मेडिटेशन तसेच ,काही पद्धती सांगितल्या, ज्याने तो घराकडे येण्यास त्याला मदत होईल. माझा गुरुदेव दत्ता वर विश्वास ठाम होता. दोन दिवस लोटले ….फक्त आणि फक्त मी रोज नित्यनियमाने Golden Chord Communication करत होते. मंगळवार दिनांक २१.०९.२०२१ सायंकाळी ७ वाजता माझा फोन खणखणला……अमृताचा फोन आला. तिने सांगितले “रेणूSss मागच्या रंगारगल्ली मध्ये दिसलाय Monty !” क्षीरसागर काकू….अमृता व माझी मैत्रीण ओंकार व मी लगेच तिथे हजर… तिथे एक पडका वाडा आहे. तिथे Monty जाऊन लपला.Monty मजल दर मजल करत घराकडे येत होता. मी व ओंकारने खूप आवाज दिले पण तो आलाच नाही. साधनाताईंना ही हकिकत सांगितली. त्यांनी कन्फर्म केलं होतं. तो Montyच आहे. रिकामा प्लॉट व कचरा आहे. असेच सिग्नल देत आहे. बुधवार २२.०९.२०२१ सकाळी ५ वाजता Monty परत वाड्यातून बाहेर आला . क्षीरसागर काकूंनी मला कॉल केला. मी ५.३० वाजता जागी झाले. ६.३०ला त्याला आणायला गेले. वाड्याबाहेर पेडिग्री दिलली. पण Monty काही दिसेना 😔संध्याकाळी परत ६.३०ला मन्मथला Stroller मध्ये बसवलं व खूप आवाज दिले ..पण तो आला नाही. माझे डोळे त्याला पाहायला अक्षरश: तरसले होते. मी साधना ताईंना सांगितलं त्यांनी मला जसे करायला सांगितले तसेसर्व प्रयत्न केले. साधनाताई म्हणाल्या Golden Chord हार्ट टू हार्ट❤️❤️ कनेक्ट व्हा. व Monty ला घराकडे खेचा. त्याला साद घाला. स्वामींचे व दत्ताचे पाठबळ द्या. बुधवार दिनांक २२.०९.२०२१ मी रात्री दत्ताचे व स्वामींचे ध्यान केले रात्री ११ वाजता ओंकार वाड्यासमोर जाऊन थांबला पण हाती निराशाच आली.
◦ गुरुवार दिनांक २३.०९.२०२१ वेळ सकाळी मी विस्मय व मन्मथ परत वाड्यासमोर गेलो. मी येताना खाऊची पिशवी सोबत ठेवत असे. खूप आवाज दिले पण नाही….मी माघारी फिरणार होते. घरातून निघताना दत्ताला मनोमन म्हटले ,”हे गुरुदेव दत्ता ..🙏🏻😇आज गुरुवार आहे. ७ वर्षे झाली. मी गुरुवार करत होते .माझी निर्मळ भक्ती ..माझ्या पोटी दत्तजयंतीला गुरुवारी विस्मय दिलास ,गुरुवारीच मन्मय दिलास ,सगळ छान केलं. माझ्या Montyला आज सापडू दे. २५ दिवस मी हरएक क्षण त्याच्या आठवणीने तळमळत होते. ओंकारचे पण कामात लक्ष नव्हते. रस्त्यात बऱ्याच जणी भेटल्या क्षीरसागर काकूंची सून अमृता माझी चांगली मैत्रीण आहे. Monty दिसला की तीपण कॉल करायची. पण आम्ही तिथे जाऊन पोचायच्या आधी तो तिथून पळ काढत असे. गुरुवारी ७ वाजता मी, विस्मय माघारी फिरणार होतो. म्हटलं वाड्याच्या मागच्या बाजूने एकदा जाऊ ..मन्मथचा Stroller फिरवला ,वाड्याच्या मागे बरीच झाडे, पडकी भिंती होत्या. ७ वाजता सकाळीची नीरव शांतता Montyच्या उच्चारने भेदली जात होती. 🤗निराशेच्या गर्तेतून परत घराकडे जड 😔🥺👎🏿पावले वळत होती. दहा पावले पुढे गेलो आणि कानावर म्याव म्याव शब्द आदळले. जागीच थांबले. परत आवाज दिले…. मॉन्टी, बाळा तुला न्यायला आलीये….म्याव म्याव…. हृदय हवेत तरंगत होतं..हास्य, अश्रू, वेदना, स्फूरण, आकांक्षा, 🤗🙏🏻🥺परमोच्च आनंद, देवावर भोळा भाबडा विश्वास, साधना- शर्मिला ताईंचे शब्द सगळ्या भावना एकवटल्या होत्या ….वाड्याच्या मागे गाडी पार्किंगसाठी डॉक्टर खताळ यांचे गॅरेज होते. पत्र्याच्या खालून हात जाईल इतकी जागा… दोन पिवळे डोळे, गोजिरवाणी दोन मऊमऊ हात, केविलवाणं तोंड करून माझं बाळ, माझा मॉंटी मला बोलवत होता. 😘😘मी अक्षरशः डोके जमिनीला लावलं. खाली वाकली होय… तो Montyच होता. Special 26…..२६ दिवसांच्ा प्रतीक्षेनंतर मला तो दिसला. मी पत्र्यातून हात आत घातला. कारण गॅरेजला कुलूप होतं. माझे हात Montyने चाटले. डॉक्टर खताळ यांना आवाज दिला. त्यांची मुलगी साखर झोपेतून उठली. साहेबांना कुलुप उघडे पर्यंत दम नव्हता. मी पत्रा फाकवला व शरीराची कमान करून Montyने माझ्या अंगावर झेप घेतली. अश्रू नकळतच ओघळत होते. विस्मय आणि मी आनंदाने नाचत होतो…नेमका मी फोन घरी विसरली. शेजारच्या काकूंनी त्यांचा फोन दिला. ओंकार नुकताच उठला असेल. रिंग वाजली. मी – ओंकार, रेणू बोलतेय Monty सापडलाय माझ्याकडे आहे….! ओंकार तर आश्चर्याचा धक्यातच!! गाडी घेऊन पाच मिनिटात हजर!! ओंकार आणि मी Montyला जवळ घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर दुःख ,आनंद ,आश्चर्य …मिश्र भावना होत्या आणि मी ओंकारला एकच वाक्य म्हटले.”ओंकार, आज गुरुवार आहे…..!”🌸
◦ घरी आलो. Montyचे सर्व खाणं पिणं अंघोळ ओंकारने उरकली. २६ दिवसात मॉन्टी मायकल जॅक्सन वरून कोळशाच्या खाणीतला कामगार होऊन परतला …😂😂😂उंची वाढली होती,पण हाडं निघाली होती. सव्वीस दिवसात Monty जगात खूप काही शिकला होता. त्याला घराची ओढ होती. भीती होती. जिवाच्या आकांताने, पोटात काही नसताना तो घराकडे येण्याच्या प्रयत्नात होता. शेवटी नशीब!! प्रत्येक रात्र झाली की माझ्या अंगावर काटा येत. Monty कसा असेल? २६ रात्र त्याने जागून काढल्या होत्या. पंधरा-वीस दिवस ज्या घरात होता ,ती लोकं मला माहित नव्हती. पण त्यांनी आमच्या बाळाला खायला प्यायला दिलं. जीव लावला. त्यांचे शतशः आभार!!
◦ नुसतं Bio मध्ये AnimalLover लिहून चालत नाही. #Streetanimalhelp लिहून इन्स्टा वर फेसबुक वर स्टेटस टाकून होत नाही. प्राणिमात्रां बद्दल दया कळवळा हा मनातून असला पाहिजे. रस्त्यावर भटके कुत्रे, मांजर, वासरू, गाढव यांचा छळ करून, त्यांना दगड मारून, दात विचकाटनाऱ्या लोकांना खरोखर शिक्षा केली पाहिजे. केरळमध्ये गर्भवती हत्तीच्या पोटात फटाके फोडणाऱ्या लोकांना तिचा जीव घेणाऱ्या देव तरी माफ करेल का हो?
◦ आज सव्वीस दिवसापासून जे दैवी अनुभव आम्ही घेत होतो ते शब्दात मांडत मांडणं कठीण आहे. म्हणून Monty हरवल्यावर मदतीचा हात पुढे करणाऱ्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद!
◦ Monty गेल्यापासून आमच्या आजूबाजूची सर्व शेजारी ,भाजी बाजार मधील विक्रेते जे Montyचे मित्रच होते. प्रणव, संजय कबाडे काका, गणेश, अभिजीत धारणकर, आकाश , दर्गा जवळ राहणारे जावेद, इक्बाल भाई, मुक्तार भाई, मुजीब भाई, टेलर भैय्या जुनैद, यांनी खूप साथ दिली. माझ्या Monty साठी प्रार्थना करणाऱ्या जया आत्या, नीला ताई, आकांक्षा माझी आई, प्राजक्ता, सगळ्यांची प्रार्थना देवाने ऐकली होती. माझ्या घरी स्वयंपाकाचे काम करणारी दिपाली सुद्धा golden chord करत होती. मधूच्या सासुबाईने पण मला मंत्रजाप दिला.
◦ सौ प्रियंका कार्ले ताईंनी सुद्धा लगेचच मला साधना व शर्मिला ताई यांचा नंबर दिला ..शर्वरी, ओजस यांची खूप मदत झाली. आमच्यासाठी संजय कबाडे काका स्वतः दर्ग्याजवळ खूप वेळेस विचारपूस करून आले. माझी आई सुद्धा रोज त्यांच्यासाठी श्री निर्मला माताजीकडे प्रार्थना करत होती. आमच्या मधील दुवा म्हणजे माझी नणंद अमृता… ती स्वतः खूप मोठी animal lover आहे. 2012-13 साली संगमनेर येथे बँक वर दरोडा पडला होता. चोरांच्या हल्ल्यात आमच्या घरासमोरील एक कुत्री जखमी झाली, अमृताने स्वतः गोळ्या औषधे देऊन तिला बरं केलं. 2015 साली माझ्या सासरी 11 वर्षांपासून असलेला Great Dane जातीचा कुत्रा आजारी होता. अमृता 2015 फेब्रुवारीला पहिल्यांदा माहेर पणाला आली तेव्हा तीने दहा दिवस त्याची सर्व सेवा केली, त्याला सलाईन चालू होते. इतकंच काय तर ती त्याच्यासोबत रात्रंदिवस होती. अखेर Roxy ने जीव सोडला पण अमृताला बघूनच…🥺😘
◦ मी म्हणत नाही की सगळ्यांनी प्राणी पाळा पण निदान निसर्गात असणार्या प्राण्यांना त्रास देऊ नका. जमेल तसं त्यांना खायला घाला. प्राण्यांना सुद्धा भावना असतात, त्यांना त्यांची भाषा असते Animal Communicators चे काम खरोखरच खूप मौल्यवान आहे.दैवी साक्षात्कार आहे हा ! सव्वीस दिवसांत आम्ही ही दैवी शक्ती अनुभवत होतो आमचा विश्वास ठाम होता.. GPS tracker ला आपण Science म्हणतो मग याला काय म्हणायचे ? मी ठरवले होते जर Monty भेटला नाही तर, पर्शियन मांजरीचे सरासरी वय 13-14 वर्षे असते. आयुष्याची पुढील 14 वर्षे रोज तुझी वाट पाहिल आणि देवाला सांगेल कि Monty ला सुखी ठेव पण नाही सर्व नशिबाचा खेळ, निर्मळ प्रेम. देवावर विश्वास, प्रामाणिक प्रयत्न, आज खरोखरच शाहरुख खान चा डायलॉग म्हणावसा वाटतोय- “अगर किसी चीज के दिल से चाहो तो पुरी कायनात उसे मिलने मे लग जाती है |”
◦ दी. 8-9-2021 ओंकारने अजून एक, माऊ घरी आणली, मोस्को त्याचे नाव. Monty येईल की नाही याची खात्री ओंकारला नव्हती. तुषार मामा म्हणालाच होता “तो 100% येणार.” मामाची वाचा खरी ठरली. आता मला व ओंकारला दोन नाही चार मुले आहेत, “विस्मय, मन्मथ, मॉन्टी आणि मॉस्को” गुरुदेव दत्त असेच आमच्या पाठीशी उभा रहा ! Monty तू दिलेला ‘स्पेशल 26’ अनुभव खरोखर दैवी आहे, Monty तू मला व ओंकारला ओजस, साधना व शर्मिला ताईं सारख्या लोकांशी भेट घड्वून दिलीस. आयुष्यात आपला मार्ग व मन सरळ असेल तर घ्येय गाठणे काही अवघड नसते.”🙏🏻🧿🧿
◦ डूबकिया सिंधु में गोताखोर लगाता है |
◦ जा जा कर खाली हाथ लौटकर आता है |
◦ मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी मे
◦ बढता दुगना उत्साह इसी हैरानी मे
◦ मुठ्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
◦ कोशिश करने वालों की कभी हार नही होती
◦ – सौ. रेणुका ओंकार सराफ