परिस्थिती स्वीकारणं, परिस्थितीशी जुळवून घेत पुढे जाणं माणसांना अवघड जातं, पण निसर्ग, प्राणी पक्षी हे खूप सहजतेने करतात… सहा सात वर्षांपूर्वी स्वैपाकघराच्या खिडकीत एक कावळा यायचा. काही स्वैपाक सुरू असतानाच यायचा बरोबर. आणि त्यावेळी जे काही शिजत असेल/ तयार असेल ते देईपर्यंत काव काव करून भंडावून सोडायचा. पोळी, भाकरी, धिरडी, थालीपीठ, डोसा, भात, भजी किंवा अक्षरशः काहीही! तसे वेगवेगळे कावळे खाऊ घ्यायला यायचेच, पण हा जरा वेगळा होता. याला एकच पाय होता, बहुदा जन्मतःच! दुसरा पाय होता पण शॉर्ट होता आणि त्याला बोटं/नख्या नव्हत्या. आम्ही त्याला पहिल्यांदा बघितलं तेव्हा आश्चर्य आणि वाईट वाटलं होतं. समोरच्या कडुलिंबाच्या फांदीवर तो बसायचा. सतत …
पाळीव प्राणी जेव्हा हरवतात, तेव्हा त्यांचे पालक खूप जास्त चिंता करू लागतात… कम्युनिकेटरकडे येणाऱ्या जवळपास प्रत्येक केस मधे याचा अनुभव येतोच. कम्युनिकेशन मधे प्राण्यांनी आपण सेफ असल्याचं उत्तर दिलं तरीही आपलं बाळ नजरेला पडेपर्यंत जीवात जीव नसतोच. पण जेव्हा प्राण्यांनी दिलेल्या उत्तरांची प्रचिती येऊ लागते तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडतो… मॉली माऊ दोन दिवस घरी न आल्यामुळे काळजीत असणाऱ्या भार्गवीला मॉली बरोबर झालेलं पहिलं कम्युनिकेशन मी पाठवलं. त्यामधे मॉलीने ती सेफ आहे, घराच्या जवळच आहे आणि लवकरच स्वतःहून परत येईल असं सांगितलं होतं. तिने ती जिथे आहे असं सांगितलं, तिथल्या खाणाखुणा मॅच होत होत्या. पण ती सापडली नाही. तू काही …
communication म्हणजे काय…आपण एकमेकांशी गप्पा मारतो त्यावेळी प्रश्नाला मोजून मापून ठराविकच शब्दांत उत्तर देत नसतो.. मूळ विषयाला धरून त्या अनुषंगाने नवीन माहिती, आणखी एखाद प्रसंग गोष्ट सहज बोलला जातो…मग animal communication ही तसेच साधारण असते का?… पूर्वीचा माझा अनुभव प्रश्नाला उत्तर असा होता. पण नूपुरा चेरी मध्ये चक्क गप्पा झाल्या असाव्यात! आमच्या समजूतदार शहाण्या चेरीला(pet cat) घेऊन सव्वा वर्षानंतर प्रथमच प्रवास करणार होतो..प्रवास, लग्न घर, पाहुणे, तिथे आणखी एक माऊ असे आणखीही बरेच issues थोडे काळजी वाढवत होते म्हणून नुपूराला तिच्याशी बोलायला सांगितलं. नूपुराने तिच्याशी गप्पा मारत आम्ही सांगितलेली माहिती दिली व काही चेरीकडून घेतलीही!..त्यात चेरीने चक्क आमचे पुण्याचे घर …
भटकू, माझी स्ट्रे मांजर मध्यंतरी बरेच दिवस गायब झाली. तिच्यासाठी रोज दिवसातून तीनदा मी सगळा जावळपासचा भाग पिंजून काढत असे, खूप शोधून, खाऊचा डबा वाजवून सुद्धा काहीच अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. दिवसागणिक आशा कमी कमी होऊ लागली होती. कोणाला क्लीअर सिग्नल्स मिळत नव्हते, फार वाईट वाटू लागले होते. तरीही, शेवटची संधी घ्यावी म्हणून नुपुराला मी तिच्याशी संवाद साधण्याची विनंती केली. मला धीर देत नुपुराने तिच्याशी संवाद साधून साधारण ती कुठे आहे, आजूबाजूचा एरिया इत्यादीचे सिग्नल्स दिले, भटकू ठीक आहे हा विश्वास दिला. पुढे चार दिवसांत भटकू परतली. ती जिथे, ज्या इमारतीत सुरक्षिततेसाठी बसली होती, ते ठिकाण माझ्या घरापासून अगदीच जवळ …
◦#telepathiccommunication #animalcommunicator#animalcommunication 🙏🏻 जेथे दिव्यत्वाची प्रचिती ,तेथे कर माझे जुळती🙏🏻 ◦ नमस्कार वाचक मित्रहो! खरंतर खूप दिवसांनी आज लिहायला घेतल 📝आहे. कारण खूप दिवस झाले लिहायला घ्यायचं पण मन लागत😔 नव्हतं. आज मी जे लिहिणार आहे.त्या गोष्टीशी कदाचित बरेच लोक अनभिज्ञ आहेत.या जगात देवाने जशी मानव जात निर्माण केली.तशीच सजीव प्राणी,पक्षी,किडा-मुंगी पण 🐱🐶🐥🪰🦚केलेत.माणसाला बोलायला येत. Communicate करता येतं.म्हणून तो सृष्टीतला सगळ्यात बलवान किंवा बुद्धिमान आहे. तर आता गैरसमजातून बाहेर येण्याची वेळ आली आहे.सृष्टीला माणूस,झाड,प्राणी,पक्षी या सगळ्यांची सारखीच गरज आहे.त्याशिवाय निसर्गचक्र अधुरे आहे. ◦ दिनांक २७.०८.२०२१ वार शुक्रवार माझ्या घरी श्री.सत्यनारायणाची पूजा होती🙏🏻.श्रावण महिन्यातला सत्यनारायण मी व ओंकार पूजेला बसलो होतो.सोबत …
डेझी दापोली वरून आल्या पासून काही खात न्हवती.. सतत असे भूकंणे आणि सतत जवळ बसून अंगावर हात फिरव इतकंच म्हणणे…शेवटी आज Sharmila Apte ला फोन केला व्हिडिओ पाठवला आणि मला जी शंका होती ती खरी ठरली…मी शर्मिला फक्त फोटो आणि व्हिडिओ पाठवला ,बाकी शर्मिला ने डेझी काय म्हणते ते सोबत पाठवले आहेच.. मी दापोलीत असताना एकदा 2 ,3 तास तिला सोडून गेलो तेव्हा पासून तिला भीती वाटली मी तिला सोडून जाईन,त्या नंतर तिने माझी एक मी पाठ सोडली नाही,त्यात ती इतकी दमली,जिथं मी जात होते तिकडे येत होती,त्यात गाडीत तिला नीट बसता आले नाही,त्यामुळे तिची खूप दमणूक झाली… 😢तीचे वय,वजन …
परवाचीच गोष्ट. आमची मनू (मांजर) रोज दुपारभर मस्त ताणून देते. सोफ्याखाली तिची एक ठरलेली जागा आहे. सोफ्याच्या उशा उचलल्याखेरीज काही ती दिसत नाही. कधीतरी संध्याकाळी 6 च्या नंतर त्या जाग्या होऊन आळोखे पिळोखे देत बाहेर येतात. परवा 7 वाजले तरी हिची काही चाहूल नाही. सोफ्याच्या उशा उचलून बघितल्या तर तिथे ती नव्हतीच. मग घरभर शोध. तासभर शोधूनही सापडेना … म्हटलं गेली तरी कुठे … हे पिल्लू घरातच जन्माला आलेलं आणि जेमतेम तीन महिन्याची असताना आमच्याकडे आलेलं. आधीची आमची माऊ अचानक तडकाफडकी मरण पावल्याने मुलगा त्या बाबतीत हळवा. हिला आजिबात घराबाहेर सोडत नव्हतो आणि घरातच रहायची सवय असल्याने हिला पण बाहेर …
ढोलू यापूर्वी काहीवेळा घराबाहेर पडून हरवला आहे, सापडला आहे. सगळीच मांजरं हे उद्योग कधी न कधी करतात आणि आपला हृदयाचा ठोका चुकवतातच. यावेळी वेगळं आव्हान हे होतं की आमच्या सोसायटीत न हरवता आईच्या सोसायटीत तो हरवला. त्याला ती जागा परिचित नाही, त्यामुळे घर शोधून परत येणं कितपत शक्य होतं याबद्दल शंका आहे. आम्ही चौघं बाहेरगावी गेलो की ढोलूला आईकडे सोडून जातो, हे असं गेली साडेचार वर्ष चालू आहे…. २१ मार्चला दुपारी आईला फोन करून मी सांगितलं की आत्ता मी बाहेर जातेय, पण रात्री येऊन आम्ही ढोलूला घेऊन जाऊ. तर ती म्हणाली की कालपासून ढोलू हरवला आहे. कसा घराबाहेर गेला नजर …