
Shriniwas Mahabal
” हा विषय माझ्यासाठी खूपच नवीन होता. सुरुवातीला संमिश्र भावना मनामध्ये होती. उत्सुकता होती, तसेच हा विषय आपल्याला जमेल की नाही अशी शंका आणि काळजी मला होती. किंबहुना हा विषय पहिल्यांदाच ऐकल्यामुळे याअनुषंगाने भासणाऱ्या किंचित गुढतेच्या वलयाचा सामनाही माझे मन नेणिवेच्या पातळीवर करत होते. लोक आपल्याला हसतील की काय असेही वाटत असे. (हे आठवून आता कोर्स पूर्ण झाल्यानंतर हसू येते).
सांगण्या सारखे बरेच आहे, आणखी शिकण्यासारखे देखील खूप आहे. पण हे आवर्जून सांगावेसे वाटते कि या कोर्स मुळे मला प्रत्येक जीवामध्ये उपजत आणि अंगभूत असलेल्या या क्षमतेची ओळख झाली आणि त्याचा रोकडा अनुभव देखील आला. हे सर्व घडवून आणणाऱ्या, सतत आणि आस्थेने मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या गुरु शर्मिला मॅडम आणि नुपुरा मॅडम यांचे खूप खूप आभार. “