Back
team-8

Aaishwarya Deshmukh

feedback from course participant Aaishwarya Deshmukh

पाहुणी कोकिळा

नमस्कार सगळ्यांना,

काल रात्री 8.15 च्या सुमारास अचानक कावळ्यांचा तीव्र दंगा ऐकू आला शेजारच्या चाफ्याच्या झाडावरून…..आणि क्षणात ही कोकिळा गॅलरी च्या दारातून घरात आली , घाबरलेली , उडत होती सैरभैर खोलीत…. पंखांच्या फडफडण्याचा आवाज जरा भीतीदायक होता तरी हिंमत करून मी तिथे एका कोपऱ्यात उभी राहिले तर भयानक वेगात सूर मारल्यासारखी झेपावत होती ती इकडे तिकडे.….

मग शर्मिला, नुपुरा आठवल्या, त्या शिकवत असलेलं आठवलं, मग कोकिळेशी बोलले अर्थात टेलिपॅथिक कम्युनिकेशन ने….
….म्हणजे मी बोलले तिला कळेल का मला जमेल का … हा विचार जास्त न करता
तिला म्हणलं ….

“शांत हो, कुठेतरी बस शांतपणे, इथे सेफ आहेस,तुला काही हवंय का? ”

तरी ती घरभर उडत होती, मी नाराज झाले…..कम्युनिकेशन जमत नाहीये असं वाटून , परत बोलले पण ती घाबरून सैरावैरा उडतच होती नशीब फॅन वेळीच बंद केला होता….

पण जाणवलं की तिला पाणी हवं आणि बाहेर जायची वाट मिळत नाहीये….असा मेसेज मिळतोय …

मी तिला चुकवत किचन मध्ये पाणी आणायला पोचले कशीबशी आणि पाणी भरेपर्यंत ती किचन च्या दारावर येऊन बसली….जरा स्थिरावली ….

मी हळूच पाणी ठेवत तिच्याशी परत बोलले…

दाराखाली पाणी ठेवलं आहे ते पी शांतपणे…आणि आत्ता तू बसली आहेस त्याच्या समोरचं दार आहे त्यातून बाहेर जा तुला हवं तेव्हा…..

पण….काहीच घडेना ती दारावर तशीच शांत बसून होती , ना उडत होती ना पाणी प्यायला झेपावली …
माझं बोलणं नाही पोचते तिच्यापर्यंत, असं वाटून जरा नाराजीनेच…. तिला कळणार नाही, जाणवणार नाही अशा जागेवरून तिचं निरीक्षण करत राहिले…

.
.
पण मिनीटभरातच ती आपसूक बरोब्बर पाणी ठेवलं होतं तिथे जवळ गेली, जरा इकडे तिकडे मान वळवून थोडं पाणी प्यायली आणि परत दारावर बसली, आता ती निर्धास्त झालेली वाटली…

मला पाणी पिऊन बरं वाटतंय, बाहेर जायची वाट कळलीये, तू सांगितलंस तशी, पण मी थांबते जरा इथे थोडावेळ …. असं सांगितलेलं जाणवून गेलं….

एव्हाना कावळ्यांचं ओरडणं थांबलं होतं हे लक्षात आलं माझ्या….

आणि साधारण 5, 7 मिनिटांनी , ती बसली होती त्या समोरच्या दारातून सहजपणे उडून गेली, अगदी बाहेर जायची वाट माहीत असल्यासारखी….

मला माझा तिच्याशी साधलेला संवाद सार्थ झाल्याचं validation मिळालं असं वाटलं….
इतका वेळ बाहेर जायची वाट शोधणारी ती, सरावाची वाट असल्यासारखी बाहेर पडली….

हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन घडतं , खात्री वाटायला लागलीये, पण आपल्याच रॅशनल मनाशी बॅलन्स करत ही कला साधणं हे नक्कीच सोपं काम नाहीये, तुमचा स्वतःवर चा विश्वास आणि तुमची एकाग्रता हे साध्य होणं जितकं गरजेचं तितकंच हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन सहज साध्य….

शर्मिला, नुपुरा … मनापासून खूप खूप धन्यवाद या अद्भुत जगाशी ओळख करून देत असल्याबद्दल